“आम्ही चंद्रकांत दादांच्या शपथविधीची वाट बघतोय” काँग्रेस नेते सचिन सावंत यांचे भाजपला चिमटे

“चंद्रकांत दादांनी सर्व विषय बाजूला सारून आम्हाला हे सांगावं की, ते शपथविधी केव्हा घेणार आहेत? आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यांनी जे विधान केलं होतं की मी आजी माजी मंत्री नाही मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या दोन दिवसात कळेल. तर, चंद्रकांतदादा 72 तास आज उलटून गेले आहेत तर केव्हा घेणार आहात शपथ विधी?” असं सांवत यांनी म्हटलं आहे.

  भाजप नेते चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदाघेत ‘पुढचा नंबर काँग्रेसचा’ असा थेट इशारा दिला आहे. याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

  यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, “आज बहात्तर तास उलटून गेले आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांचा शपथविधी कुठेही पाहायला मिळाला नाही. आम्ही सकाळपासूनच उत्सुक होतो की, केव्हा चंद्रकांत पाटील शपथ घेतायत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”

  “चंद्रकांत दादांनी सर्व विषय बाजूला सारून आम्हाला हे सांगावं की, ते शपथ विधी केव्हा घेणार आहेत? आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यांनी जे विधान केलं होतं की मी आजी माजी मंत्री नाही मला माजी मंत्री म्हणू नका. येत्या दोन दिवसात कळेल. तर, चंद्रकांतदादा 72 तास आज उलटून गेले आहेत तर केव्हा घेणार आहात शपथ विधी?” असं सांवत यांनी म्हटलं आहे.

  किरीट सोमय्या म्हणजे नाटक कंपनी

  किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, “किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांना घेऊन चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या महाराष्ट्रात नाटक कंपनी बंद आहे. त्यामुळे किरीट सोमय्या हे लोकांचे मनोरंजन करत आहेत.”

  “सोमय्या जर अशा पद्धतीने लोकांचे मनोरंजन करत असतील तर आम्ही त्यांना का थांबावे? फक्त गोष्ट इतकीच आहे की त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे मनोरंजन करावे. कारण, नाटक कंपन्या बंद आहेत. तुम्ही तक्रारी करत आहात त्या करा. मात्र, चौकशी करणे हे ईडीचे काम आहे. भारतीय जनता पार्टीने ईडीचे ऑफिस आपल्या पक्षाच्या कार्यालयात सुरु केलंय का? हेही लक्षात घ्यायला हवं.”