सरकारने अधिवेशनातून पळ काढला तरी आम्ही जनतेमध्ये जावून सरकारच्या कारभाराचे वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

२६ तारखेला ओबीसीसाठी चक्का जाम करून आम्ही शांत बसणार नाही तर हा प्रश्न मुळापासून सोडवून आरक्षण पुन्हा मिळाल्या शिवाय भाजप गप्प बसणार नाही असे ते म्हणाले. ओबीसी विरोधात याचिका करण्यात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यासह माजी आमदाराचा मुलगा आहेअसे सांगत ते म्हणाले की आमच्या काळात या बाबत आम्ही न्यायालयात यशस्वी लढा दिला आणि आरक्षण जावू दिले नाही. मात्र सध्याचे मंत्री मोर्चे काढतात आणि न्यायालयात १५ महिने झोपा काढतात असे ते म्हणाले.

  मुंबई : राज्यात कोरोनाकाळात महाराष्ट्र मॉडेल हे उपचारां अभावी मृत्यू झालेल्या रूग्णाचे मॉडेल आहे अशी घणाघाती टिका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी भाजप कार्यकारिणीच्या सभेत समारोपाचे भाषणप्रश्नावर सध्याच्या नाकर्ते सरकारने दुलर्क्ष केल्याने आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत, आम्ही सत्तेवर असतो तर चार महिन्यात हे आरक्षण मिळवून दाखवले असते असे आव्हान देखील त्यानी दिले. मात्र आता आरक्षणच्या मुद्यावर संघर्षाची भुमिका घेवून जोवर प्रश्न सुटणार नाही तोवर भाजप थांबणार नाही अशी घोषणा देखील फडणवीस यानी केली.

  वाझे प्रत्येक विभागात आहेत

  ते म्हणाले की,  सध्याचे सरकार हे वसुली सरकार आहे. आम्ही मागच्या अधिवेशनात फक्त एकाच खात्यातील वाझेला समोर आणले होते मात्र असे वाझे प्रत्येक विभागात सध्या काम करत आहेत, त्यांचा भांडाफोध होवू नये म्हणून तोंडाला टाळे लावून बसलेल्या या सरकारने लोकशाहीला टाळे लावण्याचा प्रयत्न करत अधिवेशन होवू न देण्याचा निर्णय घेतला आहे. या सरकारचा भ्रष्टाचार समोर येवू नये म्हणूनच अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भाजपने आणिबाणीच्या विरोधातही यशस्वी संघर्ष केला आहे त्यामुळे अश्या सरकारला कसे वठणीवर आणायचे ते आम्ही जाणतो असे ते म्हणाले.

  आरक्षण पुन्हा मिळाल्या शिवाय भाजप गप्प बसणार नाही

  २६ तारखेला ओबीसीसाठी चक्का जाम करून आम्ही शांत बसणार नाही तर हा प्रश्न मुळापासून सोडवून आरक्षण पुन्हा मिळाल्या शिवाय भाजप गप्प बसणार नाही असे ते म्हणाले. ओबीसी विरोधात याचिका करण्यात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यासह माजी आमदाराचा मुलगा आहेअसे सांगत ते म्हणाले की आमच्या काळात या बाबत आम्ही न्यायालयात यशस्वी लढा दिला आणि आरक्षण जावू दिले नाही. मात्र सध्याचे मंत्री मोर्चे काढतात आणि न्यायालयात १५ महिने झोपा काढतात असे ते म्हणाले.

  या सरकारचे पाप आहे

  १३ डिसेंबर २०१९ ला न्यायालयात इम्परिकल डाटा प्रथम मागण्यात आला त्यावेळी महाविकास आघाडी सरकार होते त्यामुळे हे या सरकारचे पाप अहे असे ते म्हणाले. सध्या सरकार वर महिला शेतकरी  विद्यार्थी पालक आणि मराठा ओबीसी असे सर्वच समाज घटक नाराज असून रोज एक मोर्चा काढला जाईल म्हणून सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे मात्र आम्ही जनतेमध्ये जावून या सरकारच्या कारभाराचे वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही असे फडणवीस म्हणाले.