मान्सूनचे वारे कमकुवत; देशभरात पावसाची शक्यता मावळल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. राज्यात पुढील तीन दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

    पुणे : यंदाचा मान्सून शंभर टक्के समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता तथापि, अरबी समुद्राकडून येणारे मान्सूनचे वारे कमकुवत असल्याने पुढील सात दिवस मान्सुनचे वारे कमकुवत असल्याने पुढील 7 दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

    विदर्भात तुरळक सरी

    गेल्या २४ तासात महाराष्ट्रात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकणात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. राज्यात पुढील तीन दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

    तूर्त पेरणी न करण्याचा इशारा

    गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी हलका पाऊस पडत असला तरी तो पेरणीसाठी उपयोगी नाही. येत्या आठ दिवसात पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करू नये, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यात 14 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर 35 तालुक्यात 50 टक्केपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच 232 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. 80 मिमी ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे ते म्हणाले. खरीपाची पेरणी-27 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र, पुढील आठ दिवस पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.