काय ही पाकिस्तानची अवस्था! इकडे तिकडे भिक मागून चालवावा लागतोय देश; इम्रान खानची कबुली

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर आपल्या कार्यकाळात देश विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे मान्य केले आहे. सरकारकडे देश चालवण्यासाठीही पैसा नाही, त्यामुळे परदेशात आपल्याला झोळी पसरावी लागते, अशी कबुली दिली( Pakistan : country has to run here and there begging; Imran Khan's confession).

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर आपल्या कार्यकाळात देश विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे मान्य केले आहे. सरकारकडे देश चालवण्यासाठीही पैसा नाही, त्यामुळे परदेशात आपल्याला झोळी पसरावी लागते, अशी कबुली दिली( Pakistan : country has to run here and there begging; Imran Khan’s confession).

    एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, वाढती विदेशी कर्ज आणि कमी कर महसूल हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे, कारण सरकारकडे लोकांच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी पुरेशी संसाधने नाहीत. आमची सर्वांत मोठी समस्या ही आहे की आमच्याकडे आपला देश चालवण्यासाठी पुरेसा पैसा नाही, ज्यामुळे आम्हाला कर्ज घ्यावे लागते.

    मंत्री जबाबदार

    देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला आधीचे सरकार आणि त्यांचे मंत्री कुठेतरी जबाबदार आहेत, असे मत व्यक्त करायलाही इम्रान खान विसरले नाहीत. ब्रिटनचे उदाहरण देताना ते म्हणाले की, जेव्हा ब्रिटनचे मंत्री पाकिस्तानपेक्षा 50 पट अधिक उत्पन्न असलेले मंत्री परदेशात जाताना पाच तासांपेक्षा कमी कालावधीच्या फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लास वापरतात. जनतेचा पैसा ते वापरत आहेत हे त्यांना माहीत आहे. याउलट आधीच्या पाकिस्तानी नेत्यांनी यासाठी खूप पैसा खर्च केला होता.