What exactly was he doing in 'that' club? Revealed by Suresh Raina after arrest

मुंबईमध्ये वेळेबाबत नेमके काय नियम आहेत, याबद्ल रैनाला काहीच कल्पना नव्हती असे त्याच्या मॅनेजरचे म्हणणे आहे. मात्र, रैनाला जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्याने मुंबई पोलिसांना सहकार्य केले. रैना हा नियम पाळणारा व्यक्ती असून त्याने मुद्दाम हे केलेले नसल्याचा खुलासा मॅनेजरने केला आहे. यापुढेही रैना नियम पाळेल आणि सर्वांना नक्कीच सहकार्य करेल असेही त्याच्या मॅनेजरने म्हंटले आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सरेश रैनाला यावेळी अटक करण्यात आली. अटकेनंतर सुरेश रैनाने याबाबत खुलासा केला आहे.

रैनाचे मॅनेजरने याचे स्पष्टीकरण दिले आहे. मॅनेजरने एका मेलद्वारे तो तिथे कशासाठी गेला होता, याचा खुलासा केला आहे. एका शुटिंगसाठी ना त्या हॉटेलमध्ये गेला होता. रात्री उशिरा त्याचे शुटींग संपले. यांनतर हा सर्व प्रकार घडला.

मुंबईमध्ये वेळेबाबत नेमके काय नियम आहेत, याबद्ल रैनाला काहीच कल्पना नव्हती असे त्याच्या मॅनेजरचे म्हणणे आहे. मात्र, रैनाला जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्याने मुंबई पोलिसांना सहकार्य केले. रैना हा नियम पाळणारा व्यक्ती असून त्याने मुद्दाम हे केलेले नसल्याचा खुलासा मॅनेजरने केला आहे. यापुढेही रैना नियम पाळेल आणि सर्वांना नक्कीच सहकार्य करेल असेही त्याच्या मॅनेजरने म्हंटले आहे.

मुंबई पोलिसांनी मध्यरात्री साडे तीन वाजता विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर धाड टाकली. करोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या क्लबमध्ये पार्टी सुरु होती. या क्लबमध्ये सुरेश रैनासह ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि गायक गुरु रंधवाही उपस्थित होते. या सर्वासह एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.