एसटी संपाबाबत शरद पवारांच्या घरी बैठक झाल्यास त्यात वावगे काय? नारायण राणेंसह विरोधकांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचे उत्तर

एसटी संपावर अद्यापही कोणताही तोडगा निघत नसताना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तीनतास चर्चा केली मात्र त्यानंतरही काही ठोस निर्णय झाला नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधकांनी टिका केली आहे. या टिकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे(What happens if a meeting is held at Sharad Pawar's house regarding ST strike? Jitendra Awhad's reply to the criticism of the opposition including Narayan Rane).

    मुंबई : एसटी संपावर अद्यापही कोणताही तोडगा निघत नसताना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तीनतास चर्चा केली मात्र त्यानंतरही काही ठोस निर्णय झाला नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधकांनी टिका केली आहे. या टिकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे(What happens if a meeting is held at Sharad Pawar’s house regarding ST strike? Jitendra Awhad’s reply to the criticism of the opposition including Narayan Rane).

    गेल्या ४० वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

    जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडे हे मंजूर करून घ्यायचे. मुंडे साहेबांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरद पवार यांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे.

    नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. आणि जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवले पाहिजे. आणि तेच काम शरद पवार करतील, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला आहे.