पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विमानाने अमेरिकेला गेले, त्या विमानाची किंमत किती? : जाणून घ्या एका क्लिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान बोइंग-777 अनेक फीचर्सनी सुसज्ज असं आहे. हे विमान एकदा इंधन भरल्यानंतर थेट अमेरिकेपर्यंत प्रवास करू शकणार आहे. या विमानाची किंमत 8,458 कोटी रुपये इतकी आहे.

    मुंबई : संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत.

    दरम्यान मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यासह उच्च सरकारी अधिकाऱ्यांसोबत विशेष विमानाने अमेरिकेला रवाना झाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान बोइंग-777 अनेक फीचर्सनी सुसज्ज असं आहे. हे विमान एकदा इंधन भरल्यानंतर थेट अमेरिकेपर्यंत प्रवास करू शकणार आहे. या विमानाची किंमत 8,458 कोटी रुपये इतकी आहे. या विमानात जॅमर बसवण्यात आले आहेत. जॅमरमुळे शत्रूंच्या रडारचे सिग्नल जॅम होतात. या विमानावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा देखील परिणाम होऊ शकत नाही. हे विमान हवेत इंधन भरू शकते. पंतप्रधानांचे हे विशेष विमान तब्बल 35 हजार फूट उंचीवरुन ताशी 1013 किमी वेगाने उडू शकते. या विमानाची इंधन टाकी पूर्ण भरली आणि विमानाने उड्डाण केले की हे विमान सलग 6,800 मैल इतकं अंतर पार करण्यास सक्षम आहे.

    दरम्यान विमानाच्या संचलनाची जबाबदारी एअर इंडियाकडे नाही, तर भारतीय हवाईदलाकडे आहे. या विमानात सुरक्षेची मोठी काळजी घेण्यात आलेली आहे. या विमानाचा वापर पंतप्रधानांसह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीदेखील करु शकतात.