१८ जानेवारीला पृथ्वीचे काय होणार? अँल्टरॉइडमुळे पृथ्वीला धोका नासाची महत्वाची माहिती

अँस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. असं म्हटलं जात की, एक लघुग्रह एकदा पृथ्वीला धडकला होता. त्यामुळे पृथ्वीवरील डायनॉसॉर हे संपूष्टात आले. त्यानंतर अनेक लघुग्रह हे पृथ्वीच्या जवळून गेले. १८ जानेवारी रोजी सर्वात मोठ लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं नाव 7482 (1994 PC1) असं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं १८ तारखेला पृथ्वीवर काय होणार? याची भीती व्यक्त केली जात आहे.

    नवी दिल्ली : पुढील तीन दिवस म्हणजे पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, १८ जानेवारीला अँल्टरॉइडमुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. अशी महत्त्वाची माहिती नासाने दिली आहे. अँस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. असं म्हटलं जात की, एक लघुग्रह एकदा पृथ्वीला धडकला होता. त्यामुळे पृथ्वीवरील डायनॉसॉर हे संपूष्टात आले. त्यानंतर अनेक लघुग्रह हे पृथ्वीच्या जवळून गेले. १८ जानेवारी रोजी सर्वात मोठ लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं नाव 7482 (1994 PC1) असं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं १८ तारखेला पृथ्वीवर काय होणार? याची भीती व्यक्त केली जात आहे.

    १८ तारखेला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाची  रुंदी ही जवळपास 3 हजार 551 फूट आहे. एक्सपर्ट्सच्या मते हा लघुग्रह पृथ्वीपासून 1.2 मिलियन अंतरावरून जाणार आहे. नासानं या गोष्टीमुळे पृथ्वीला धोका असू शकतो, असं म्हणलं आहे. तसेच पृथ्वीवर मोठी हानी होऊ शकते अशी भीती सुद्धा वर्तविली आहे. नासानं भविष्यात लघुग्रहांना पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नासानं डार्ट मिशन लाँच केले आहे. गेल्या आठवड्यात देखील एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता.

    दरम्यान, नासा सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज यांनी त्यांच्या वेबसाइटवरून माहिती दिली आहे. त्यांनी वेबसाइटवरील माहितीमध्ये सांगितले की, या लघुग्रहामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. नासाचे एक्सपर्ट गेली अनेक दिवस या लघुग्रहाचा अभ्यास करत आहेत. 18 जानेवारी रोजी जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीनं या लघुग्रहाला खेचले तर हा लघुग्रह पृथ्वीला आदळू शकतो.  त्यामुळे या लघुग्रहाचा पृथ्वीला धोका आहे. असं नासाने म्हटलं आहे.