Whether Maharashtra's Chitraratha will be allowed to run on Delhi's Rajpath on January 26, 2021

मागच्या वेळेस २६ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत होणाऱ्या राजपथावर आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्राच्या  निवड समितीने नाकारला होता. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.तेव्हा " मराठी रंगभूमीचा १७५ वर्षे" या संकल्पनेवर हा चित्ररथ आधारित होता. अत्यंत राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वात जास्त आमदारांची संख्या असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आली. आज या सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे.

मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार की नाही याची  धास्ती पुन्हा एकदा  महाराष्ट्र सरकारला लागली आहे. चालू वर्षीच्या  प्रजासत्ताक दिनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने  महाराष्ट्राचा चित्ररथाला  नाकारल्याने तेव्हा देश पातळीवर मोठे राजकीय रणकंदन माजले होते.

दर,  २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी  महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात जावा अशी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असते. आपल्या मराठी माणसांचा  झेंडा या निमित्ताने तरी मोठ्या तोऱ्यात  लाल किल्ल्याजवळ फडकतो. याचा अभिमान संपूर्ण मराठी माणसाला या दिवशी असतो.

मागच्या वेळेस २६ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत होणाऱ्या राजपथावर आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्राच्या  निवड समितीने नाकारला होता. यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.तेव्हा ” मराठी रंगभूमीचा १७५ वर्षे” या संकल्पनेवर हा चित्ररथ आधारित होता.

अत्यंत राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महाराष्ट्रात नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वात जास्त आमदारांची संख्या असणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर सारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आली. आज या सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे.

मात्र, त्यानंतर योगायोगाने २६ जानेवारी २०२०च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नेमके महाराष्ट्राला दिल्लीच्या पथसंचालनात चित्ररथ आणण्यासाठी परवानगी मिळाली नाही. हा धागा पकडत तेव्हा केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी जुगलबंदी सुरू होती. यावर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तर थेट दिल्लीच्या सरकारवर शाब्दिक हल्ला केला होता.

यावेळी  २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरकार “महाराष्ट्राची संत परंपरा” या संकल्पनेवर (थीम) चित्ररथ तयार करीत असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्लीला जावून केंद्रीय गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या असणाऱ्या निवड समिती समोर आपली थीम मांडली  आहे.

मात्र, आपल्या  अधिकाऱ्यांच्या मनात अजून धाकधूक आहे की,येवढी तयारी करून जर पुन्हा आपआपला  चित्ररथ नाकारला येवढ्या मेहनतीवर पाणी फिरले जाईलच पण  महाराष्ट्राची मोठी नाचक्की होईल.याची चिंता ही संबंधित अधिकाऱ्यांना असल्याचे कळते.

आता पर्यत महाराष्ट्राने चित्ररथ पथसंचालनात अनेक वेळा पहिला क्रमांक पटकाविला आहे. २०१५ नंतर पंढरीची वारी आणि शिवराज्याभिषेक या दोन चित्ररथला प्रथम क्रमांक मिळाला होता.

१९९३ ते १९९५ या सलग तीन वर्षे गणेशोत्सव, हापूस आंबा, बापू स्मृती या चित्ररथला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. बैल पोळा या संकल्पनेवर आधारित चित्ररथलाही यापूर्वी पहिला क्रमांक मिळालेले आहे.