कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे की काय अशी परिस्थिती; टास्क फोर्सचे प्रमुख डॉ ओक यांचा इशारा

शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या 'इन्फोडोस' या डिजिटल जनजागृती अभियानात बोलताना कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ ओक म्हणाले की, दुसरी लाट ओसरते आहे असे आपण म्हणू लागलो आहोत पण ती लाट संपूर्णपणे ग्राऊंड झीरो लेव्हलला यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय अशी परिस्थिती वाटू लागली आहे.

    मुंबई : राज्यात कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय अशी परिस्थिती वाटू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, अशी भिती कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ ओक यानी व्यक्त केली आहे.

    शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ‘इन्फोडोस’ या डिजिटल जनजागृती अभियानात बोलताना कोविड-१९ टास्क फोर्सचे प्रमुख डॉ ओक म्हणाले की, दुसरी लाट ओसरते आहे असे आपण म्हणू लागलो आहोत पण ती लाट संपूर्णपणे ग्राऊंड झीरो लेव्हलला यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय अशी परिस्थिती वाटू लागली आहे.

    लसीकरण पाहिजे त्या गतीने होत नाही

    ते म्हणाले की, राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असे सांगून राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक म्हणाले की, व्हायरस आपले रुप बदलत आहे. नवीन उपप्रकार समोर येत आहेत. दुसरीकडे लसीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही. कोविडसंबंधी नियमांचे पालनही होताना दिसत नाही, यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत. ते म्हणाले की, आज बेड्स आहेत, ऑक्सिजन उपलब्ध आहे पण आयसीयू बेड्स फुल व्हायला लागले आहेत, असे चित्र आहे. लोकशिक्षण, लोकजागर आणि उपाय या तीन गोष्टी एकत्र करत कोरोनोशी लढा द्यावा लागणार आहे, असेही डॉ ओक म्हणाले.