यूपीएमध्ये शिवसेनेला घ्यायचे की नाही? हे मी ठरवू शकत नाही पण राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावे; भाई जगताप यांचा इशारा

यूपीएमध्ये शिवसेनेला घ्यायचे की नाही? हे मी ठरवू शकत नाही काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे ठरवतील. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मविआ सरकारमध्ये मराठा, ओबीसी आरक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावे. असेही भाई जगताप म्हणाले(Whether to include Shiv Sena in UPM or not? I can't decide whether the state government is due to Congress; Bhai Jagtap's warning).

    मुंबई : यूपीएमध्ये शिवसेनेला घ्यायचे की नाही? हे मी ठरवू शकत नाही काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे ठरवतील. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मविआ सरकारमध्ये मराठा, ओबीसी आरक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज्यातील सरकार काँग्रेसच्या जीवावर आहे हे लक्षात घ्यावे. असेही भाई जगताप म्हणाले(Whether to include Shiv Sena in UPM or not? I can’t decide whether the state government is due to Congress; Bhai Jagtap’s warning).

    आरएसएसचा अजेंडा देशात राबवू देणार नाही

    स्वातंत्र्यासाठी लढणा-या काँग्रेसने आता भाजप विरुध्द लढा उभारला आहे. देशातील लोकशाही बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र आम्ही आरएसएसचा अजेंडा देशात राबवू देणार नाही असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे. येत्या २८ डिसेंबरला कॉंग्रेस नेते राहुल गांधी शिवाजी पार्कवर येणार आहेत. यावेळी सोनिया गांधींनाही येण्याचे निमंत्रण दिले आणि विनंती केली आहे अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. देशात ओमायक्रॉन पसरत असताना पंतप्रधान सभा घेतात, निवडणुका होत आहेत. हे वेळीच थांबले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.

    बाळासाहेब ठाकरेचे योगदान तुलनेत नक्कीच मोठे

    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत भूमिका मांडताना भाई जगताप म्हणाले, कंगना रणावतला पद्मभूषण पुरस्कार मिळत असेल तर बाळासाहेब ठाकरेचे योगदान तुलनेत नक्कीच मोठे आहे. बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हवे, ही तोगडिया यांची मागणी असेल तरी मला त्याबाबत माहित नाही, असेही ते म्हणाले.