एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होता, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी विचारलाय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखावरूनच शिवसेनालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न राणे करताना दिसत आहे. जर सचिन वाझे हा एक केवळ पोलीस अधिकारी होता, तर कुणाच्या ना कुणाच्या आदेशाशिवाय एन्काऊंटर करू शकत नाही. हे आदेश कोण देत होतं, ते तपासून पाहणं गरजेचं असल्याचा हल्लाबोल नारायण राणेंनी केलाय.
गेल्या काही दिवसांपासून उजेडात आलेलं सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवून केलेला गौप्यस्फोट हे मुद्दे मविआ सरकारची पाठ सोडायला तयार नाहीत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी या मुद्द्यावरून सरकारला टार्गेट करायला सुरुवात केलीय.
एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून एन्काऊंटर करत होता, असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी विचारलाय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखावरूनच शिवसेनालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न राणे करताना दिसत आहे. जर सचिन वाझे हा एक केवळ पोलीस अधिकारी होता, तर कुणाच्या ना कुणाच्या आदेशाशिवाय एन्काऊंटर करू शकत नाही. हे आदेश कोण देत होतं, ते तपासून पाहणं गरजेचं असल्याचा हल्लाबोल नारायण राणेंनी केलाय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. राष्ट्रवादीतील कार्यक्षम नेत्यांनी गृहमंत्रीपद स्विकारायला नकार दिल्यामुळेच हे पद अनिल देशमुखांकडे आलं होतं. मात्र आपल्या खात्यात काय सुरूय, हेदेखील देशमुखांना कळलं नसल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून सचिन वाझे वसुली करत होता, तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी, असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला होता.
यालाच टार्गेट करत नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. राज्यात गेल्या सव्वा वर्षापासून धुळवड सुरू आहे. संजय राऊत यांनी पहिल्यांदाच सामनातून सत्य परिस्थिती मांडली असल्याचं राणे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांना वाझेंबद्दल असं काय प्रेम आहे, असा सवालही राणेंनी केलाय.