praneeti shinde

सध्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे. त्यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. माघ वारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायतील असल्याने सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे. या शिवाय राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील देवस्थानांच्या समित्यांवर राजकीय नेत्यांची कार्यकर्त्याची वर्णी लवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सुरू केला आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

    गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाव आघाडीवर

    सध्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे. त्यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. माघ वारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायतील असल्याने सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे.

    या शिवाय राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पण वारकरी संप्रदायाशी निगडित हे देवस्थान असल्याने या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी ऐवजी वारकरी संप्रदायाशी संबंधित व्यक्तींना संधी देण्याची मागणी होत आहे.

    वारकरी संप्रदायाकडून राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीला विरोध होत आहे. वारकरी मंडळींचा विचार करणारी व्यक्ती इथे असावी, ही त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता राजकीय नेत्याला संधी देते की वारकऱ्यांचे प्रश्न समजणाऱ्या व्यक्तीला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.