आज चुरशीच्या कसोटी सामन्यात कोण जिंकणार? विजयासाठी भारताला हवा आहेत ८ विकेट

आजच्या चौथा दिवशी फलंदाजी करणे सोपे असणार नाही, तर आफ्रिका संघाला विजयासाठी शंभरपेक्षा अधिक धावांची गरज आहे, तर भारताला आठ विकेटची गरज आहे, त्यामुळं आजच्या सामन्यात पारडे कुणाच्या बाजूने झुकणार याकडे क्रिकेटप्रेंमीचे लक्ष लागले आहे.

    केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसअखेरीस डीन एल्गरला जसप्रीत बुमराहने बाद केल्याने भारताला दुसरे यश मिळाले आहे. पण शेवटच्या सत्रात दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला आणि त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गरला नाबाद घोषित करण्यात आल्यावरुन वादही चव्हाट्यावर आला. आजच्या चौथ्या दिवशी विजयाची कोण पताका फडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    एल्गरला रविचंदनन अश्विनने एलबीडब्ल्यू आऊट केले, पण एल्गरने डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) घेतला आणि चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले. हे पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले, कारण चेंडू खूपच खाली होता आणि चेंडू यष्टींवरून गेला असे प्रक्षेपण दाखवत होते. त्यामुळेच कर्णधार विराट कोहली, गोलंदाज आर अश्विन आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी जोरदार टीका केली.

    दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २१व्या षटकातील चौथा चेंडू अश्विनने टाकला, एल्गर त्या चेंडूचा बचाव करू शकला नाही आणि चेंडू पायावर गेला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी बाद करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अंपायरने एल्गरला बाद घोषित केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एल्गरने सहकारी फलंदाज पीटरसनशी बोलून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. एल्गरने डीआरएस रिव्ह्यू घेतल्यानंतर, बॉल ट्रॅकिंग टीव्ही रिप्लेमध्ये दिसले आणि असे दिसून आले की चेंडू खेळपट्टीच्या रेषेवर आला पण खेळपट्टीला आदळल्यानंतर तो स्टंपमधून बाहेर पडताना दिसत होता. हे पाहून भारतीय संघातील खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला.

    दरम्यान आजच्या चौथा दिवशी फलंदाजी करणे सोपे असणार नाही, तर आफ्रिका संघाला विजयासाठी शंभरपेक्षा अधिक धावांची गरज आहे, तर भारताला आठ विकेटची गरज आहे, त्यामुळं आजच्या सामन्यात पारडे कुणाच्या बाजूने झुकणार याकडे क्रिकेटप्रेंमीचे लक्ष लागले आहे.