BMC

सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण ८७,१४६ पदे मंजूर असून २८,६०८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक क गटात १०,५५३ पदे आहेत. तर ड प्रवर्गात १५,७८९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण २३,३६३ पदे मंजूर असून ९५२० पदे रिक्त आहेत.

    मुंबई : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या महानगर पालिकेत तब्बल ३८ हजार रिक्त पद असल्याची बाब समोर आली आहे. यात चतुर्थ श्रेणी प्रवर्गातील पदांचा समावेश अधिक आहे. पालिकेत सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत १,१०, ५०९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी ३८,१२८ पदे ही रिक्त पदे आहेत.

    सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण ८७,१४६ पदे मंजूर असून २८,६०८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक क गटात १०,५५३ पदे आहेत. तर ड प्रवर्गात १५,७८९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण २३,३६३ पदे मंजूर असून ९५२० पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ड वर्गात ५०२० पदे रिक्त आहेत.

    तर क आणि ड वर्गात दोन्ही संवर्गात ३३,०४३ पदे रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. ही पदे तात्काळ भरण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे.