मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेंची नियुक्ती गैर कायद्यानुसार का केली ? ; किरीट सोमय्यांचा सवाल

सोमय्या म्हणाले की, सचिन वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीचं पुन्हा पोलीस दलात घेण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसारचं वाझेंची नियुक्ती झाली होती. उद्धव ठाकरे यांनी ही नियुक्ती गैर कायद्यानुसार का केली, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणापासून राज्याच्या राजकारणात अनेक आरोप – प्रत्यारोप होत आहेत. वाझे प्रकरणाच्या तपासातून अनेक खुलासे समोर येत आहेत. तसेच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या सर्व प्रकरणावरुन सामनातून राज्य सरकारवर चिंता व्यक्त केली आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सोमय्या म्हणाले की, सचिन वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीचं पुन्हा पोलीस दलात घेण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसारचं वाझेंची नियुक्ती झाली होती. उद्धव ठाकरे यांनी ही नियुक्ती गैर कायद्यानुसार का केली, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

    सामनातून काय म्हणाले संजय राऊत?

    महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ठाकरे यांचे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. त्यामुळे फाटक्या फुग्यात हवा भरण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे आरोप सुरुवातीला जोरदार वाटतात. नंतर ते खोटे ठरतात. सचिन वाझे हे आता रहस्यमय प्रकरण झाले. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख लोक यांचा लाडका व भरवशाचा असा हा वाझे फक्त साधा सहाय्यक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसांचे अमर्याद अधिकार कोणाच्या आदेशाने दिले हा खऱ्या चौकशीचा विषय आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वाझे वसुली करीत होता तर गृहमंत्र्यांकडे याबाबत माहिती का नसावी? असा सवाल राऊतांनी केला.

    दरम्यान, देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो, असं राऊतांनी सामनातून व्यक्त केलं आहे.