ajit pawar

काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना गृहमंत्री यांच्या प्रकरणासंबधात प्रश्न केले असता, त्यांनी बोलणे टाळले.

    मुंबई  : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते. असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या सर्व प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मौन का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीसाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना गृहमंत्री यांच्या प्रकरणासंबधात प्रश्न केले असता, त्यांनी बोलणे टाळले. आणि प्रदेशाध्यक्षांनी जी भूमिका मांडली तीचं भूमिका पक्षाची असल्याचं नमूद केलं. मात्र सचिन वाझे प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला तेंव्हाही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले होते. या प्रकरणी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषींवर कारवाई केली जाईल. अस म्हणाले होते.

    दरम्यांन परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यावर अजित पवारांचं मौन का ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे विरोधकांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री का बोलत नाहीत असा सवालही विरोधी पक्षांनी केला आहे. परमबीर सिंग याच्या गंभीर आरोपाची माहिती शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनाही होती असं परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. यावरही अजित पवारांनीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे अजित पवार कधी मौन सोडणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.