सोशल मीडियावर का होतोय #i_stand_with_kiran_mane ट्रेंड? मनोरंजन क्षेत्रातून विवीध प्रतिक्रीया; वाचा कोण काय म्हणालं?

अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रीया दिली असून ते म्हणाले की, ‘या विषयावर भाष्य करणे मला महत्त्वाचे वाटले. कारण सोशल मीडियावर कलाकारांनी अशाप्रकारचे राजकीय वक्तव्य केल्यास त्यांना मालिकेतून काढले जाते का? खरंच असे होते का? हे जाणून घेण्यासाठी हे प्रकरण मला महत्त्वाचे वाटते. कारण मी मागील २ वर्षापासून शिरुर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा खटकतात त्याविरोधात मी नेहमीच व्यक्त होत असतो. मात्र, असे असताना मला कोणत्याच वहिनीकडून अशाप्रकारचे कोणताही अनुभव आला नाही असे अमोल कोल्हे म्हणाले. ज्या वेळेस मी निवडणूक लढवत होतो तेव्हा झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत होतो तेव्हा वाहिनीकडून अशा प्रकारचे कोणताही विरोध करण्यात आला नाही.’

  मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने Actor Kiran Mane यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या अभिनेते माने यांच्या समर्थनात #i_stand_with_kiran_mane हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोक त्यांना पाठींबा देत आहेत तर काही लोक त्यांच्या विरोधातही प्रतिक्रीया देत आहेत.

  ‘माझ्या बाबतीत असं घडलं नाही’ – अमोल कोल्हे

  या सर्व प्रकरणावर प्रसिध्द अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रीया दिली असून ते म्हणाले की, ‘या विषयावर भाष्य करणे मला महत्त्वाचे वाटले. कारण सोशल मीडियावर कलाकारांनी अशाप्रकारचे राजकीय वक्तव्य केल्यास त्यांना मालिकेतून काढले जाते का? खरंच असे होते का? हे जाणून घेण्यासाठी हे प्रकरण मला महत्त्वाचे वाटते. कारण मी मागील २ वर्षापासून शिरुर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा खटकतात त्याविरोधात मी नेहमीच व्यक्त होत असतो. मात्र, असे असताना मला कोणत्याच वहिनीकडून अशाप्रकारचे कोणताही अनुभव आला नाही असे अमोल कोल्हे म्हणाले. ज्या वेळेस मी निवडणूक लढवत होतो तेव्हा झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत होतो तेव्हा वाहिनीकडून अशा प्रकारचे कोणताही विरोध करण्यात आला नाही.’

  पॅनोरामा एंटरटेनमेंटचे स्पष्टीकरण

  किरण माने यांच्यावर झालेली कारवाई कोणत्याही राजकीय पोस्टमुळे नाही तर काही व्यावसायिक कारणांमुळे झाल्याचे स्पष्टीकरण मालिकेच्या पॅनोरामा एन्टरटेन्मेंट या प्रोडक्शन हाऊसकडून देण्यात आले आहे. किरण माने यांना याबाबत आधी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांच्या कानावरही काही गोष्टी घालण्यात होत्या मात्र त्याचा काहीही परिणाम न झाल्यामुळे निर्मांत्यांना हे पाऊल उचलावे लागले असे कंपनीने म्हटले आहे.

  ‘ही तर दडपशाही’ – दिग्दर्शक समीर विध्वांस

  “कोणतीही राजकीय भूमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे”, असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  महाराष्ट्रात दडपशाही चालू देणार नाही – अतुल लोंढे

  अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष तो कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

  ‘त्यांनी एसटी संपावर देखील आपले मत मांडले होते, पण..’ – मंत्री उदय सामंत

  प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, केंद्र सरकारच्या विरोधात मत असू दे किंवा राज्य सरकारच्या विरोधात असू दे, हा त्या व्यक्तीचा अधिकार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मी त्यांच्या अनेक पोस्ट पाहिल्या आहेत. त्यांनी एसटी संपावर देखील आपले मत मांडले होते. त्यांनी केलेल्या सूचना जर चांगल्या असतील तर त्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते केवळ केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढणे कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी सामंत यांनी उपस्थित केला आहे.