दोन्ही सरकारांनी ‘त्या’ बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही, आपचा मविआ आणि भाजपला सवाल

का देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी देवेन भारती यांच्या विरोधात कोणताही कारवाई करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही ? आम्ही हे जाणून घेण्याची मागणी करतो की, का सुबोध जयस्वाल, परमबीर सिंग हे सगळे देवेन भारती यांना वाचवण्यासाठी पुढे का धजावले ? आणि का संजय बर्वे हे देवेन भारती यांच्या विरोधात कारवाई करू शकले नाही, असे अनेक सवाल आपने आपल्या पत्रकार परिषदेतून विचारले आहेत.

  महाराष्ट्रातील विद्यमान महाविकास आघाडी आणि आधीच्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्यावर अनेक आरोप करूनही कारवाई केली नाही, असा दावा आम आदमी पक्षाने सोमवारी केला. ‘आप’ नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी हे आरोप केले आहेत. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आयपीएस अधिकाऱ्यांवर देखील भ्रष्ट कारभाराचे आरोप केले जात आहेत.

  निवृत्त पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतींवर संघटिक गुन्हेगारीचा आरोप करत स्वतःच्या जीवास धोका असून सरंक्षणाची मागणी करणारे पत्र लिहिले होते, असा दावा मेनन यांनी निवेदनाद्वारे केला आहे. देवेन भारती पोलीस दलामध्ये गुन्हेगारांचं मंडळ चालवत आहेत का ? त्यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत का ? त्यांना सगळ्या राजकीय पक्षांकडून वाचवलं जात आहे का ? संजय पांडे यांची सार्वजनिक चौकशी केली जावी, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे.

  क्राईम इन युनिफॉर्मच्या विरोधात सार्वजनिक चौकशी केली जावी.

  महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण देत आहेत, असा खळबळजनक आरोप आपने केला आहे. राजकीय पक्षांना यातून प्रत्यक्षपणे फायदा होतोय का ? माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या लहान अधिकाऱ्यांना हॉटेल्समधून खंडणी वसूल करण्याची सूचना दिली. कुतूहल वाटतं की, त्यांनी या विषयासंबंधात जेव्हा ते पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते तेव्हा बोलणं टाळलं.

  महासंचालक संजय पांडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, परमबीर सिंह हे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या चौकशीमध्ये अडथळा आणत आहेत. पांडे पुढे म्हणतात की, त्यांनी देवेन भारती यांच्या संघटित गुन्हेगारी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वैयक्तिकरित्या माहिती सांगितली होती. त्यांनी या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये शिफारस केली होती की, देवेन भारती यांच्या संदर्भात गुन्हेगारी केस दाखल करावी पण कोणत्याही प्रकारची पाऊलं उचलली गेली नाहीत. असे आपने आपल्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  खेदजनक बाब म्हणजे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये निवृत्त एसीपी राजेंद्र त्रिवेदी यांनी लिहिलं, ज्या पत्रात ते खंडणीच्या आरोपात गँगस्टर एजाझ लकडावाला जो  सध्या मोक्काअंतर्गत तुरुंगात आहे. त्याची चौकशी पांडे यांनी केली असता तो त्या चौकशीत म्हणतो आयपीएस अधिकारी देवेन भारती हे त्यांच्या खंडणी धंद्याचे बॉस आहेत. लकडावालाच्या साक्षीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे लकडावाला आणि त्यांचे इतर साथीदार यांना मोक्का अंतर्गत अटक करतात. परंतू देवेन भारती विरोधात कोणत्याही प्रकारची पाउलं उचलली जात नाहीत. गँगस्टरने दिलेली साक्ष ही त्याच्या इतर साथीदारांना मोक्काअंतर्गत अटक करण्यासाठी कशी काय पुरेशी आहेत? मात्र त्यामुळे देवेन भारती यांच्या विरोधात साधा एफआयआर सुद्धा दाखल करू नये? असा सवाल आपने उपस्थित केला आहे.

  देवेन भारती यांच्यावरील आरोप हे काही नवीन नाहीत. गँगस्टर विजय पलांडे जो आरोपी आता तुरुंगात आहेत. त्याने सुद्धा केंद्रीय दक्षता विभागाला देवेन भारती यांच्या गुन्हेगारी वर्तुळाबाबत २०१८ साली लिहिलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. जेव्हा माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सुद्धा आरोप केला होता की, ज्या दिवशी पीटर मुखर्जी म्हणाले की देवेन भारती यांना शीना बोरा यांच्या चौकशीदरम्यान गायब होण्यासंदर्भात माहीत होतं. तेव्हा दुसऱ्या दिवशी राकेश मारिया यांची देवेंद्र फडणवीस यांनी बदली केली होती.

  का देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांनी देवेन भारती यांच्या विरोधात कोणताही कारवाई करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही ? आम्ही हे जाणून घेण्याची मागणी करतो की, का सुबोध जयस्वाल, परमबीर सिंग हे सगळे देवेन भारती यांना वाचवण्यासाठी पुढे का धजावले ? आणि का संजय बर्वे हे देवेन भारती यांच्या विरोधात कारवाई करू शकले नाही, असे अनेक सवाल आपने आपल्या पत्रकार परिषदेतून विचारले आहेत.