nitesh rane

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असा सवाल केल्याने शिवसैनिकांनी नितेश राणेच्या विरोधात पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे(Will Balasaheb's Shiv Sena also change its name? Shiv Sainiks angry over question; Shiv Sena lodges complaint with police against Nitesh Rane).

    मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असा सवाल केल्याने शिवसैनिकांनी नितेश राणेच्या विरोधात पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे(Will Balasaheb’s Shiv Sena also change its name? Shiv Sainiks angry over question; Shiv Sena lodges complaint with police against Nitesh Rane).

    नितेश राणेंच्या विरोधात सेना आक्रमक

    काळाचौकी आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये नितेश राणेंविरोधात तक्रारीचे पत्र शिवसैनिकांनी दिले आहे. तर भायखळा शिवडी, काळाचौकी वरळी येथे नितेश राणे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी सेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

    स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही तक्रार दिली आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचे नाव बदलले जात आहे. असे चूकीचे ट्विट केल्यावरुन तसेच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचेही नाव बदलणार का असे ट्विट केल्यावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.