शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देणार; कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  मुंबई : राज्याचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. 3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

  अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना
  • 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी
  • कृषी पंप जोडणी धोरण राबवणार
  • कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटींचा निधी
  • विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी
  • संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
  • 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणा
  • 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार
  • 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले
  • शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले
  • 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले
  • 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने
  • प्रत्येक तालुक्यात अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येईल.
  • महाडीबीटी पोर्टलवर 11 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, 25 लाख अर्ज प्राप्त झाले आहे.
  • चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी प्रमाणं तीन वर्षे 600 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
  • मत्सव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी नाबार्डकडून अर्थसहाय्य
  • कुक्कुटपालन व्यवसायासाठी पुणे येथे संशोधन केंद्र
  • पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार
  • कृषी आणि इतर क्षेत्रासाठी 3274 कोटी निधी प्रस्तावित