वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पुन्हा पाहणी करुन पंचनामे करणार; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले(Will re-inspect the farms of the excluded farmers and conduct panchnama; Information of Revenue Minister Balasaheb Thorat). अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, प्रकाश सोळंके, यांनी  प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

    मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी आणि पंचनामे पुन्हा करण्यात येतील, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले(Will re-inspect the farms of the excluded farmers and conduct panchnama; Information of Revenue Minister Balasaheb Thorat). अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील सुर्जी शेंडगाव येथील शेतकऱ्यांना तलाठी यांनी यादीतून वगळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, प्रकाश सोळंके, यांनी  प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

    थोरात म्हणाले की, जून आणि जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती खरडून गेलेली असताना यादीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच तलाठी यांनी वगळले ही बाब खरी नाही. याशिवाय ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची सर्वेक्षण पंचनामा यादी ग्रामपंचायत बोर्डावर प्रसिध्द केली होती.

    तसेच या यादीबाबत काही आक्षेप असल्यास ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत आक्षेप दाखल करण्याचे कळविले होते. तसेच ५ ऑगस्ट २०२१ रोजी प्राप्त आक्षेपांबाबत संयुक्त पथकाने शेतीची पाहणी आणि पंचनामा करुन प्राप्त आक्षेप विहीत कालावधीत निकाली काढलेले आहेत.