समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की…

राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी एका वर्षांत समीर वानखेडेंची नोकरी घालवणार. त्यांची तुरुंगात रवानगी करणार, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्य सरकार समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?

    राज्य सरकारकडून समीर वानखेडेंच्या चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्न उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही, असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

    दरम्यान, मी खुलं आव्हान देतो की, एका वर्षाच्या आत समीर वानखेडे यांची नोकरी घालवणार, समीर वानखेडेंना तुरुंगवास निश्चित आहे. तुम्ही केलेला खोटारडेपणा जनतेच्या समोर आणणार, समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या घरातील सर्व लोक बोगस आहेत, असं नवाब मलिक म्हणाले होते.