२७ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार? मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेणार; शिक्षण मंत्र्याचा सावध पवित्रा

राज्यातील शाळा  कोरोना संसर्गाच्या कारणाने दिवाळीपूर्वी सुरू करण्याबाबत राज्य सरकारची तयारी नाही. मात्र शाळा कोरोना संसर्ग कमी असलेल्या तालुक्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या १८ हजार शाळा २७ सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा मेस्टाने केली असून शिक्षण मंत्र्यांनी मात्र त्यावर  मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची सावध भूमिका घेतली आहे.

  मुंबई : राज्यातील शाळा  कोरोना संसर्गाच्या कारणाने दिवाळीपूर्वी सुरू करण्याबाबत राज्य सरकारची तयारी नाही. मात्र शाळा कोरोना संसर्ग कमी असलेल्या तालुक्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या १८ हजार शाळा २७ सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा मेस्टाने केली असून शिक्षण मंत्र्यांनी मात्र त्यावर  मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची सावध भूमिका घेतली आहे.

  १८ हजार शाळा या २७ सप्टेंबरपासून

  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हिंगोलीच्या दौऱ्यावर त्यांनी शाळा सुरू करण्यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र शिक्षणसंस्था चालकांची संघटना मेस्टाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या १८ हजार शाळा या २७ सप्टेंबरपासून कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळत आणि त्यासाठीची पालकांची संमती घेत सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

  ऑनलाईन शिक्षणा धोरणाकडे लक्ष दिले नाही

  मागील दीड वर्षांपासून ग्रामीण भागातील आणि विशेषत: उपेक्षित घटकातील मुले ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या शिक्षणापासून वंचित आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी धोरण जाहीर करण्याच्या मागणी कडे शिक्षणमंत्र्यांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आता ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला अशा गावागावातील पालकांची संमती घेण्याची मोहीम सुरू केली असून त्याच धर्तीवर २७ सप्टेंबरपासून पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करणार असल्याचे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी म्हटले आहे.

  या विरोधातही न्यायालयात जावू

  त्यापूर्वी शालेय शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णया विरेाधातही मेस्टोने न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. आता शाळा सुरू करण्यावरून शिक्षण विभागाला दिलेल्या आव्हानाला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत  सरकारसोबत संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. आम्ही या विरोधातही न्यायालयात जावू असा इशाराही डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी दिला आहे.