लसीकरण झाल्यावरच शाळा सुरु होणार? मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच पहिली ते आठवीचे नियमीत वर्ग सुरु होणार; टास्क फोर्सच्या बैठकीत होणार चर्चा

राज्यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रममाणात  ओसरत असून दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर पहिली पासूनच्या सर्व शाळांना नियमीत वर्ग भरविण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक या सप्ताहात होण्याची शक्यता आहे(1st to 8th school reopen in maharashtra). मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गैरहजेरीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत या बाबत बैठक घेतली जावू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांत कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

    मुंबई  : राज्यात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रममाणात  ओसरत असून दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर पहिली पासूनच्या सर्व शाळांना नियमीत वर्ग भरविण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची बैठक या सप्ताहात होण्याची शक्यता आहे(1st to 8th school reopen in maharashtra). मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गैरहजेरीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामार्फत या बाबत बैठक घेतली जावू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसांत कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

    सरकारकडे संस्थाचालकांची विचारणा

    दरम्यान मुंबईसह राज्यातील शिक्षणसंस्थानी शाळा सुरु करण्याबाबत अनुकुलता दाखवली आहे.  १ ली ते ८ वी वर्ग सुरु करण्याकरता राज्य सरकारकडे या संस्थाचालकांनी विचारणा सुरू केली आहे. अनलॉकनंतर, सार्वजनिक ठिकाणी गर्दीत लहान मुलांचा वावर वाढल्यानंतरही लहान मुलांमधील  कोविड प्रकरणे नगण्य आहेत.  त्यामुळे, बगिचे, क्रिडांगणे ,बाजार,  याठिकाणी लहान मुलांचा वावर वाढला असताना शाळा सुरु करण्यास हरकत नाही, असे सार्वत्रिक मत आहे.

    मुलांचे लसिकरण सुरु केल्यांनतरच शाळा

    मात्र,  याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तसेच कोविड टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार लहान मुलांचे लसिकरण सुरु केल्यांनतर शाळा सुरु करण्याचा आग्रह करणे योग्य आहे.  त्यामुळे लहान मुलांचे लसिकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने  दिला आहे याबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत अंतिम निर्णय या सप्ताहात होण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.