सरकारचा आदेश झुगारुन 27 जानेवारीनंतर राज्यातील शाळा खरचं सुरु होणार का?

ज्याप्रमाणे कोविड काळात हॉटेल, मॉल आणि चित्रपटगृह यांना 50 टक्के प्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळा सुद्धा 50 टक्केप्रमाणे सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी मेस्टाकडून करण्यात आली आहे. सरकारने याबाबत विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा 27 तारखेनंतर थेट शाळा सुरू करण्याचा इशारा मेस्टाने दिला आहे. यामुळे राज्यात 'मेस्टा' विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटला असून 27 जानेवारीनंतर राज्यातील शाळा खरचं सुरु होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे(Will schools in the state really start after January 27?).

  ज्याप्रमाणे कोविड काळात हॉटेल, मॉल आणि चित्रपटगृह यांना 50 टक्के प्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळा सुद्धा 50 टक्केप्रमाणे सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी मेस्टाकडून करण्यात आली आहे. सरकारने याबाबत विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा 27 तारखेनंतर थेट शाळा सुरू करण्याचा इशारा मेस्टाने दिला आहे. यामुळे राज्यात ‘मेस्टा’ विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटला असून 27 जानेवारीनंतर राज्यातील शाळा खरचं सुरु होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे(Will schools in the state really start after January 27?).

  महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज्यात इंग्रजी शाळा विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. मेस्टाशी संबंधित 18 हजार शाळा राज्यात आहेत. कोरोना आणि ऑमीक्रोनच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण शाळा सरसकट 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यातील काही शाळा सोमवारी उघडल्याने राज्य सरकारच्या निर्णयाला केराची टोपली दाखविण्यात आली.

  शाळांबाबत मुख्यमंत्री 4 ते 5 दिवसांत सीएम निर्णय घेतील. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. हे खरं असलं तरी कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे असे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

  नागपूर, औरंगाबादेत काही शाळा सुरू

  औरंगाबादमधील 250 शाळा सोमवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांनी दिली. तसेच, नागपूरमधील अशा 30-40 शाळा सुरु झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही विद्यार्थ्याचे नुकसान होतेय, हे कारण दाखवत शाळा सुरु करण्यासाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

  हे सुद्धा वाचा
  • 2022