आजारी मुख्यमंत्री आज तरी सभागृहात हजेरी लावणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत संजय राऊत यांनी म्हटले की, विधानसभेचे अधिवेशन उत्तम प्रकारे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. संबंधित बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. विधानसभेत येणार का, याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळत राऊत यांनी 'वेट अॅण्ड वॉच' अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय राऊत म्हणाले, ‘अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झालं आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेट अँड वॉच.. पहा काय होतंय ते.”

    विधीमंडळाच्या अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजर राहिले. पण, अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला.

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत संजय राऊत यांनी म्हटले की, विधानसभेचे अधिवेशन उत्तम प्रकारे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. संबंधित बैठकांनाही ते उपस्थित राहत आहेत. विधानसभेत येणार का, याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळत राऊत यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर चर्चा सुरू झाल्या आहेत.

    संजय राऊत म्हणाले, ‘अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झालं आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेट अँड वॉच.. पहा काय होतंय ते.”

    दरम्यान, आजचा अधिवेशनाचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम असल्याची चर्चा आहे.