जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकल सुरु होणार?

मुख्यमंत्री निर्णयाबाबत सकारात्मक असल्याची माहिती मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे मार्च महिन्यापासून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या अनलॉकमध्ये लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या. मात्र त्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच आहेत. त्यानंतर नवरात्रात महिलांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली. लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. त्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.