Eknath Khadase

ज्यामुळे मंत्रीपद सोडवं लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सन २०१६ मध्ये राज्याचे महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले. भूखंड खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मुंबई : ईडीची नोटीस आल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला आहे. भोसरी भूखंड प्रकरणी खडसे यांना ईडीने ही नोटीस बजावली आहे. ईडीने खडसेंना पाठविलेल्या नोटीसमध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याची आदेश दिले आहेत. यामुळे पून्हा एकदा खडसे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

ज्यामुळे मंत्रीपद सोडवं लागलं तोच घोटाळा पून्हा एकदा खडसेंचे राजकीय अस्तित्व धोक्यात आणणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सन २०१६ मध्ये राज्याचे महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले.

भूखंड खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खडसेंनी राजीनामा दिला होता. नैतिकतेच्या मुद्दयावर खडसेंनी राजीनामा दिल्याचे त्यावेळी भाजपकडून सांगण्यात आले होते.

नेमका आहे तरी काय हा भोसरी भूखंड घोटाळा?

भोसरी एमआयडीसी येथील तीन एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावानं खरेदी केल्याचा एकनाथ खडसेंवर आरोप होता. त्यावेळेस या भूखंडाची बाजार भावाची किंमत ४० कोटी इतकी होती. असे असताना त्यांनी हा भूखंड ३ कोटी ७५ लाखांना खरेदी केल्याचा आरोप झाला.

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यात आली. स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी ३७ लाख रुपये देखील भरण्यात आले होते. या भूखंडाचा सातबारा हा एमआयडीसीच्या नावावर होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. चौकशीनंतर एप्रिल २०१८च्या शेवटच्या आठवड्यात लाचलुचपत विभागानं पुण्यातील सत्र न्यायालयात अहवाल सादर केला ज्यात त्यांनी खडसे यांना क्लीनचिट दिली.

मात्र, यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला यात तक्रारदार करण्याची विनंती न्यायालयाला केली होती.यानंतर न्यायालयानं त्यांना या खटल्यात तक्रारदार केलं. याबाबतचा खटला सध्या पुण्यातील सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.