film city

कुरार पोलिसांना मालाड पूर्व अप्पापाडा परिसरात लता नावाची महिला चरसचा धंदा करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारवर पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे दोन किलो चरस आढळून आले. ही महिला गोरेगाव फिल्म सिटीमध्ये काम करणाऱ्या टीव्ही कलाकारांना ड्रग्जची विक्री करण्याचे काम करायची.

    मुंबई : मालाड पूर्व कुरार पोलिसांनी एका महिला ड्रग्ज पॅडलरला अटक केली आहे. हा पॅडलर आपल्या दोन मुलांसोबत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या टिव्ही कलाकारांना ड्रग्ज पुरवायचा. अटक केलेल्या महिलेचे नाव लता यादव (४५) असून तिचे दोन मुले अजय आणि विजय यादव अप्पापाडा परिसरात राहतात. महिलेकडून दोन किला चरस हस्तगत केली आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात ४० लाख रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुरार पोलिसांना मालाड पूर्व अप्पापाडा परिसरात लता नावाची महिला चरसचा धंदा करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारवर पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे दोन किलो चरस आढळून आले. ही महिला गोरेगाव फिल्म सिटीमध्ये काम करणाऱ्या टीव्ही कलाकारांना ड्रग्जची विक्री करण्याचे काम करायची.

    या महिलेचा मोठा मुलगा विजय यादव सहा महिन्यांपूर्वी बिहारमध्ये २५ किलो चरससोबत अटक झाला आहे. तर १६ जूनला छोटा मुलगा अजय यादवला अॅन्टी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने अडीच किलो चरससह अटक केली आहे. याची ५० लाख किंमत असल्याचे बोलले जात आहे.

    पतीच्या मृत्यूनंतर लता यादव आपल्या दोन मुलांच्या मदतीने ड्रग्जच्या धंद्यात चांगली फोफवली होती. तिचे दोन मुले अजय आणि विजय मुंबईशिवाय राज्याबाहेरही ड्रग्जचा धंदा करायचे. या दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केली आहे. एकाला बिहार तर एकाला मुंबईतून अटक झाली.