Work begins to explore alternative spaces for metro carsheds Information of Urban Development Minister Eknath Shinde

कांजूरमार्गची ४० हेक्टरची जागा ही ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो ३, ४ आणि ६ या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे. मात्र, या जागेसाठी राज्य सरकारविरोधात केंद्र सरकार (खार जमीन आयुक्त) न्यायालयात गेले असल्याने आणि सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत अधिक बोलता येणार नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई : राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र आणि राज्याने एकत्र बसून मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. दरम्यान, कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या मनीषा कायंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील उपस्थित होते. मेट्रो कारशेडच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन अनुकुलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रेा कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे शिंदे म्हणाले.