पर्यावरण संवर्धन: भारतीय रेल्वेतील विद्युतीकरण

२०१४ पासून पर्यावरण अनुकूल आणि प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वे विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढला आहे. ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे १००% विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर, २०२३ पर्यंत संतुलित ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वेने ठरविले आहे.

    मुंबई : #भारतीय रेल्वे (आयआर) मिशन मोडमध्ये काम करीत आहे आणि जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी कार्यरत आहे आणि २०३० पूर्वी “निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नवीन भारताच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी प्रभावी, वक्तशीर आणि प्रवाशांचे तसेच मालवाहतुकीचे आधुनिक वाहक होण्यासाठी पर्यावरणपूरक, कार्यक्षम, कमी खर्चिक होण्यासाठी रेल्वेला मार्गदर्शक सर्वांगीण दृष्टी लाभली आहे. रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात विद्युतीकरणापासून दररोज पाणी आणि कागदी संवर्धन ते प्राण्यांना जखमी होण्यापासून वाचविण्यापर्यंतच्या छोट्या चरणांपर्यंतच्या पर्यावरणाला मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    २०१४ पासून पर्यावरण अनुकूल आणि प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वे विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढला आहे. ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे १००% विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर, २०२३ पर्यंत संतुलित ब्रॉडगेज (बीजी) मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. यामुळे डिझेलचे ट्रॅक्शन कमी होण्यास मदत होईल त्यायोगे कार्बन पदचिन्ह आणि पर्यावरण प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

    मध्य रेल्वेत, २०१४-२१ मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू असल्याची माहिती श्री शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी दिली.

    विद्युतीकरणाचे फायदे:

    • पर्यावरण पूरक वाहतुकीची पद्धत,
    • आयात केलेल्या डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन मौल्यवान विदेशी चलन वाचते आणि कार्बनच्या फूटप्रिंट कमी होतात,
      ऑपरेटिंग खर्च कमी होतो,
    • अवजड मालवाहतूक करणार्‍या रेल्वेगाड्या आणि जास्त लांब प्रवासी गाड्यांना लागणा-या अधिक क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हजमुळे वहनक्षमतेत वाढ होते.
    • ट्रॅक्शन चेंजमुळे होणारा उशीर कमी करून विभागीय क्षमता वाढविण्यात येते,
    • विद्युत लोकोचे ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च कमी होतो.

    हेड ऑन जनरेशन (एचओजी) :

    भारतीय रेल्वेत हेड ऑन जनरेशन (एचओजी) प्रणाली देखील आहे, ज्यायोगे लोकोमोटिव्हद्वारे ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) कडून थेट डब्ब्यांत विद्युत दिली जाते. यामुळे ट्रेनमध्ये वेगळ्या पॉवर कारची गरज कमी होते त्यामुळे अतिरिक्त कोच ओढण्याची आवश्यकता कमी होते आणि कार्यक्षमता वाढते. कार्बन पदचिन्हांमध्ये (फूटप्रिंट) वर्षाकाठी ३१,८८,९२९ टन कपात होईल व उर्जा मोटारींच्या (Power Car) उन्मूलनामुळे इंधन खर्चामध्ये २,३०० कोटी रुपयांची बचत होईल.

    World Environment Day2021 Environmental Conservation Electrification of Indian Railways