
एका भारतीयाने असा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, जो याआधी कुणीच केला नाही. डीएमआरसीच्या एका कर्मचाऱ्याने सर्व मेट्रो स्टेशनवर सर्वांत वेगात प्रवास करण्याचा रेकॉर्ड केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्येही याची नोंद झाली आहे. दिल्ली मेट्रोने या कर्मचाऱ्याचा मेट्रो स्टेशनवर उभे राहून हातात गिनीज रेकॉर्डचे प्रमाणपत्र घेतलेला फोटोही शेअर केला आहे. प्रफुल्ल सिंह असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी फक्त 16 तास 2 मिनिटांत 348 किलोमीटर अंतर गाठून 254 मेट्रो स्टेशनचा प्रवास केला आहे. असा रेकॉर्ड करणारी ही पहिली व्यक्ती आहे(World record for the first time in India; The staff made the fastest journey on the metro).
दिल्ली : एका भारतीयाने असा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, जो याआधी कुणीच केला नाही. डीएमआरसीच्या एका कर्मचाऱ्याने सर्व मेट्रो स्टेशनवर सर्वांत वेगात प्रवास करण्याचा रेकॉर्ड केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्येही याची नोंद झाली आहे. दिल्ली मेट्रोने या कर्मचाऱ्याचा मेट्रो स्टेशनवर उभे राहून हातात गिनीज रेकॉर्डचे प्रमाणपत्र घेतलेला फोटोही शेअर केला आहे. प्रफुल्ल सिंह असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी फक्त 16 तास 2 मिनिटांत 348 किलोमीटर अंतर गाठून 254 मेट्रो स्टेशनचा प्रवास केला आहे. असा रेकॉर्ड करणारी ही पहिली व्यक्ती आहे(World record for the first time in India; The staff made the fastest journey on the metro).
29 ऑगस्ट 2021 ला त्यांनी हा रेकॉर्ड केला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटनुसार प्रफुल्ल सिंह यांनी सांगितले की, मी बऱ्याच कालावधीपासून दिल्ली मेट्रोमध्ये आहे. त्यामुळे मला या सर्व मेट्रो लाइनबाबत चांगलीच माहिती आहे.
कोणते स्टेशन आणि कोणत्या मार्गावरून सुरू करायचे आहे आणि कुठे शेवट करायचा आहे, याचे प्लॅनिंग करायचे होते. जेणेकरून वेळेआधी मी माझा रेकॉर्ड पूर्ण करेन, असेही त्यांनी सांगितले.