चिंताजनक : राज्यात कोरोना मृत्युचा आकडा वाढतोय; आज २२७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु

राज्यात आज २२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यु हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

  • नवीन रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

मुंबई : बुधवारी राज्यात तब्बल २२७ कराेना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मागील आठवड्याभरातील कराेना मृत्युची संख्या पाहता, हा आकडा दिवसेदिवस वाढतच असल्याचे समाेर येत आहे. ज्यामुळे आराेग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यािशवाय राज्यात ३९,५४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २८,१२,९८० झाली आहे. आज २३,६०० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३,५६,२४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज २२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १२९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यु हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३७ मृत्यू पुणे-१५, पालघर-५, जळगाव-४, जालना-३, गाेंदिया-२, ठाणे-२,अहमदनगर-१, औरंगाबाद-१, नागपूर-१, नांदेड-१, नािशक-१ आिण वाशिम-१ असे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,१२,९८० (१४.२१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १७,८६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ५३९९ रुग्णांची नोंद

दरम्यान मुंबईत दिवसभरात ५३९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४१४७७३ एवढी झाली आहे. तर आज १५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११६९० मृत्यूची नोंद करण्यात आली.