rusticated police

खुनाची सुपारी आणि भंगाराचा माल विकल्या प्रकरणी वसईतील दोन महिला पोलिसांना(two women police rusticated) गेल्या महिनाभरात निलंबीत करण्यात आले आहे.

    वसई: खुनाची सुपारी आणि भंगाराचा माल विकल्या प्रकरणी वसईतील दोन महिला पोलिसांना(two police rusticated) गेल्या महिनाभरात निलंबीत करण्यात आले आहे.त्यामुळे एरवी शांत असणार्‍या वसई पोलीस ठाण्यातील वातावरण तप्त झाले आहे.

    विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने भंगारात विकल्या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून मंगल विलास गायकवाड यांनी दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांना शनिवारी निलंबीत करण्यात आले असून,भंगारात १०-१२ टन मुद्देमाल विकण्याची कामगिरी त्यांनी कोणाच्या सांगण्यानुसार केली याचा तपास करण्यात येत आहे.

    तसेच त्यांनी विकलेला माल ताब्यातही घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली.मंगल गायकवाड या गेल्या महिन्यात निलंबीत करण्यात आलेल्या वसई पोलीस ठाण्यातील दुसर्‍या महिला ठरल्या आहेत. तालुक्यातील सर्वात कमी गुन्हे आसलेले,शांत, निसर्गरम्य अशी वसई पोलीस ठाण्याची ख्याती आहे.मात्र,याच पोलीस ठाण्यातील दोन महिलांनी गंभीर गुन्हे केल्यामुळे ते आता चर्चेत आले आहे.

    गेल्या महिन्यात महामार्गावर रिक्षा उलटलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता.त्याचा तपास लावल्यावर वसई पोलीस ठाण्यातील महिला पोलीस स्नेहल पाटील यांच्या रिक्षाचालक पतीचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.अनैतिक संबंधातून त्यांचा खून करण्यासाठी वसई पोलीस ठाण्यातील एका पोलिसाची मदत स्नेहन पाटील हिने घेतल्याचे गेल्या महिन्यात तपासात उघड झाले होते.त्यामुळे पाटील हिला पोलीस सेवेतून निलंबीत करण्यात आले होते.

    आता मंगल गायकवाड या महिला पोलिसाला १२ टन भंगार विकल्याच्या गंभीर प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.त्यामुळे महिनाभरात दोन गंभीर गुन्ह्यात एकाच पोलीस ठाण्यातील दोन महिला पोलीसांना निलंबित करण्यात आल्याची पहिलीच घटना वसई तालुक्यात घडली आहे.