कासा-विक्रमगड मार्गावर विचित्र अपघात,ट्रकमधल्या विटा अंगावर कोसळल्याने चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी

कासा - विक्रमगड मार्गावर(accident on kasa virakgad road) भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या अन्य ट्रकला धडक दिल्याने एक ट्रक बाजूला कोसळून दादडे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रकमधील सिमेंटच्या विटा(death by bricks falling) लग्न कार्यातून आलेल्या आणि रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत बसलेल्या ७ तरुणांवर कोसळल्या.

    विक्रमगड: कासा – विक्रमगड या मार्गावर(accident at kasa vikramgad road) दादडे गावाजवळ रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास भरधाव येणाऱ्या दोन ट्रकला अपघात झाला. या अपघातात रस्त्याच्या कडेला बसलेल्या काही तरुणांवर ट्रकमधील विटा कोसळून यात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ट्रक चालकांसह ५ जण जखमी झाले आहेत.

    कासा – विक्रमगड मार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या अन्य ट्रकला धडक दिल्याने एक ट्रक बाजूला कोसळून दादडे गावाजवळ भीषण अपघात झाला. ट्रक मधील सिमेंटच्या विटा लग्न कार्यातून आलेल्या आणि रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत बसलेल्या ७ तरुणांवर कोसळल्या. यात जयेंद्र रावते, अनिल खरपडे, राहुल दुमाडा व सचिन खांजोडे हे चौघे मित्र ठार झाले असून अजय डाबरे, संग्राम पालव, सुरज गुरव यासह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

    अपघात घडताच ट्रकमधील कोसळलेल्या विटा स्थानिकांनी तातडीने बाजूला करून जखमींना विक्रमगड ग्रामीण रुग्णालय, कासा रुग्णालयात तसेच जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यावेळी दोघांचा विक्रमगड तर एकाच कासा व अन्य एकाच सायन येथे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान विक्रमगड पोलीस या घटनेबाबत गुन्हा नोंदवून अधिक चौकशी करीत आहेत.