
मोखाड्याजवळील(fire in mokhada) ब्राह्मण गावातील एका घराला आणि एका दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू (4 people died in fire)झाला.
मोखाडा: पालघर(palghar) जिल्ह्यातील मोखाडा (mohada)तालुक्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मोखाड्याजवळील ब्राह्मण गावातील एका घराला आणि एका दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.
ब्राह्मण गावमधील अनंता मौळे यांच्या घराला आणि दुकानाला रात्री अडीचच्या सुमार आग लागली.त्यावेळी घरातील सगळेजण झोपलेले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. आगीच्या लागल्यानंतर लगेच गावकरी मदतीला धावले. घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आलं तर काही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे.
या घटनेमध्ये मौळे कुटुंबातील अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलं वाचली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिकमधील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अनंता मौळयांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते मोखाडा येथे उपचार घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.