वीजपुरवठा खंडित केल्याचा त्याने काढला राग, महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केली मारहाण – पोलिसांनी केली अटक

थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित(electricity connection disconnected ) केल्याच्या रागातून वीज ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात घुसून सहायक अभियंत्याला मारहाण व दमदाटी केल्याची गंभीर घटना विरार-अर्नाळा(virar arnala) येथे मंगळवारी घडली होती. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा(crime) दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    वसई : महावितरणाच्या(mahavitran) विरार येथील सहाय्यक अभियंत्याला मारहाण (mahavitran officer beaten up)आणि दमदाटी केल्याप्रकरणी एका ग्राहकाला अटक करण्यात आली आहे.थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून वीज ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात घुसून सहायक अभियंत्याला मारहाण व दमदाटी केल्याची गंभीर घटना विरार-अर्नाळा येथे मंगळवारी घडली होती.याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    महेंद्र  घरत (रा. पादरीची वाडी, अर्नाळा) असे आरोपीचे नाव असून तो सरकारी कर्मचारी असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने घरगुती वीज वापराचे बिल भरलेले नव्हते. वारंवार विनंती करूनही घरत याने ११ हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने ३० मार्च रोजी त्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याचा राग येऊन आरोपी घरत याने अर्नाळा येथील कक्ष कार्यालयात जाऊन सहायक अभियंता सुशांत मेश्राम यांना मारहाण व शिवीगाळ केली. घटनेनंतर तक्रार देण्यास निघालेल्या मेश्राम यांना अडवून आरोपीने पुन्हा दमदाटी करून पोलिसांकडे जाण्यास अटकाव केला. सहायक अभियंता मेश्राम यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा), कलम ३४१ (अडवून ठेवणे), कलम ३२३ (मारहाण), कलम ५०४ व ५०६ (शिवीगाळ व दमदाटी) नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.

    सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे हे गंभीर स्वरुपाचे व अजामीनपात्र गुन्हे असून या गुन्हात कडक शिक्षेची तरतुद आहे. आरोपींविरुद्ध कडक कारवाईसाठी महावितरण आग्रही असून कठोर शिक्षेसाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.