accident on palghar manor road

पालघर रस्त्यावरून मनोरकडे जाताना(Accident On Palghar Manor Highway) एक नादुरुस्त ट्रक टोईंग करून नेत असताना पालघरकडे येणाऱ्या खडी भरलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे रस्त्यात अपघात घडला.ट्रकला अपघात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल पसरून रस्ता निसरडा झाल्याने पालघर-मनोरकडील वाहतूक थांबविण्यात (Traffic Jam On Palghar Manor Road)आली आहे.

    पालघर :पालघर- मनोर महामार्गावर (Palghar Manor Highway)साई धाबा परिसरामध्ये झालेल्या विचित्र अपघातातमुळे मनोर पालघर रस्त्यावरील वाहतूक गेल्या अर्ध्या तासापासून कोलमडली(Traffic Jam On Palghar Manor Road) आहे. पालघर व मनोर बाजूने वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी दोन तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    पालघर रस्त्यावरून मनोरकडे जाताना एक नादुरुस्त ट्रक टोईंग करून नेत असताना पालघरकडे येणाऱ्या खडी भरलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे रस्त्यात अपघात घडला. या अपघातात ट्रकचा चक्काचुरा झाला.कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकला अपघात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल पसरून रस्ता निसरडा झाल्याने पालघर-मनोरकडील वाहतूक थांबविण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.