प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पालघर (Corruption In Palghar)जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी(Animal Husbandry  Officer Arrested For Corruption) संजीत धामणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले.

    पालघर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(Anti Corruption Bureau) दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच व लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचा आवाहनाला त्वरित प्रतिसाद मिळाल्याने पालघर (Corruption In Palghar)जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी(Animal Husbandry  Officer Arrested For Corruption) संजीत धामणकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच (Bribe)घेताना रंगेहाथ पकडले.

    तक्रारदार महिला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून धामणकर याने दहा हजाराची लाच स्वीकारली. तक्रारदार पशुवैद्यकीय अधिकारी यांची बदली झाली असताना धामणकर याने तक्रारदार यांना कार्यमुक्त व पदभारमुक्त करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दिली प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली व सापळा रचला धामणकर यांनी २०००० पैकी दहा हजार रुपयाची आगाऊ रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धामणकर याला रंगेहात पकडले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वप्न विश्वास यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.