Crowd on Asheri fort; Forget social distance as soon as restrictions are relaxed

आशेरी गडावर ट्रेकिंगसाठी अनेक दुर्ग प्रेमी, वन संरक्षक, वन प्रेमी जात असतात. आशेरी गडावर अजूनही पुरातन वस्तू असून त्यात पाण्याची कुंड, देवीचे मंदिर, तोफ, दगडी गुफा आहेत. या गडावर जाण्यासाठी एका ठिकाणी लोखंडी शिडी आहे. पायऱ्या खूप कमी प्रमाणात असून चढाई करणे खूप कठीण आहे. उंच डोंगर, दऱ्या, कपारी तुन वाट काढत वर चढावे लागते. त्यात पावसाळयात चिखल असल्याने गडावर जाणे खूप धोकादायक आहे. तरी देखील पर्यटक जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात नजर चुकुवून जात आहेत.

    डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर चारोटी पासून आठ किलोमीटर अंतरावर कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडा खडकोना येथून दोन किलोमीटर अंतरावर चालून गेल्यावर आशेरी गडावर जाता येते. गेल्या आठवड्यात निर्बंध शिथिल केल्यामुळे पर्यटक माेठ्या संख्येने येथे जात असल्याचे दिसून आले. मागील रविवारी संडे सिलेब्रेशनसाठी सकाळी तरुणांच्या झुंडी गडावर निघाल्या होत्या. यात मुंबई, पालघर जिल्ह्यातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील गर्दी कमी होत नाही. यामुळे पुन्हा तिसरी लाट लवकरच धडकू शकते. त्यामुळे आता पुन्हा आशेरी गडावर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

    आशेरी गडावर ट्रेकिंगसाठी अनेक दुर्ग प्रेमी, वन संरक्षक, वन प्रेमी जात असतात. आशेरी गडावर अजूनही पुरातन वस्तू असून त्यात पाण्याची कुंड, देवीचे मंदिर, तोफ, दगडी गुफा आहेत. या गडावर जाण्यासाठी एका ठिकाणी लोखंडी शिडी आहे. पायऱ्या खूप कमी प्रमाणात असून चढाई करणे खूप कठीण आहे. उंच डोंगर, दऱ्या, कपारी तुन वाट काढत वर चढावे लागते. त्यात पावसाळयात चिखल असल्याने गडावर जाणे खूप धोकादायक आहे. तरी देखील पर्यटक जीवाची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात नजर चुकुवून जात आहेत.

    २० जुनच्या  रविवारी शेकडोंच्या संख्येने सकाळीच मोठया प्रमाणात तरुणांचे लोंढे गडावर पर्यटनासाठी निघाले होते. त्या बाबतचे व्हीडिओ सर्वत्र प्रसिद्ध झाले. तरुण गर्दीत गडावर चढत असून गडावर एकमेकांना पकडून नृत्य देखील करीत आहेत. मोठ्या प्रमाणात घोळका देखील होत होता. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी कासा पोलिसांनी नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करत दंड वसूल केला होता.

    जवळपास ५ हजारांच्या वर पर्यटक एकाच दिवशी गडावर गेल्याने मोठी गर्दी होती. त्यातच गड चढ़ायला व उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी येथे रस्ता लहान असल्याने पर्यटकांना उतरण्यासाठी रात्र झाली होती. यामुळे आशेरी गड हा पर्यटकांसाठी बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. गडाच्या पायथ्याशी तशा प्रकारचे फलकही लावण्यात आले आहेत. तसेच शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.