car in the sea

संचारबंदी मोडून वसईच्या समुद्र किनार्‍यावरील(vasai beach) रिसॉर्टमध्ये रात्री-बेरात्री बेकायदा लेट नाईट पार्ट्या(late night parties) सुरु असल्याचे एका बुडालेल्या(car sank in sea) मारुती स्विफ्ट डिझायर(maruti swift desire) कारमुळे उघडकीस आले आहे.

वसई : संचारबंदी मोडून वसईच्या समुद्र किनार्‍यावरील(vasai beach) रिसॉर्टमध्ये रात्री-बेरात्री बेकायदा लेट नाईट पार्ट्या(late night parties) सुरु असल्याचे एका बुडालेल्या(car sank in sea) मारुती स्विफ्ट डिझायर(maruti swift desire) कारमुळे उघडकीस आले आहे.

वसईच्या कळंब समुद्रात एक स्विफ्ट डिझायर कार तरंगत असल्याचे बुधवारी सकाळी दिसून आले. किनार्‍यापासून सुमारे पाच-सहाशे मीटर आता समुद्राच्या लाटांवर ही कार दिसल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर कारच्या मालकाने किनार्‍यावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार दिसेनाशी झाली. जवळपास पंधरा-वीस तास ही कार लाटांवर तरंगत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

किनार्‍यावर उभी केलेली कार भरतीमुळे पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना या किनार्‍यावर घडल्या आहेत.तरीही पर्यटकांची बेफिकीरी कमी झाली नसल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.

नाताळ सणापुर्वी २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचार बंदी करण्यात आली आहे.ही संचारबंदी मोडून समुद्र किनार्‍यांवरील नाईट पाटर्यांचे आयोजन केले जात असल्याचे या घटनेमुळे उघड झाले आहे.

कळंब,राजोडी या समुद्र किनार्‍यावर सायंकाळनंतर मद्यपी आणि गर्दुल्ले आपला अड्डा जमवत असतात. त्यानंतर ते जवळच्या रिसॉर्टमध्ये आसरा घेत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.रिसॉर्ट आणि पोलीसांशी वैर नको म्हणून ग्रामस्थांनी गप्प बसणे पसंत केले आहे.ही संधी साधून लेट नाईट पार्ट्या दररोज सुरु आहेत. समुद्रात बुडालेल्या कारने या पार्ट्यांचे पितळ उघड केले आहे. हा पुरावा धरून पोलीसांनी लेट नाईट कारवाई करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

वसईतील तरुण-तरुणींचा ग्रुप कळंबच्या किनारी मंगळवारी सायंकाळी आला होता. त्यांनी आपली कार किनारी पार्क करून ते रिसॉर्टमधील पार्टीत रममाण झाले.सकाळी उठल्यावर त्यांना आपली कार समुद्रात तरंगत असल्याचे दिसून आले.त्यानंतर पोलीसांच्या मदतीने कारचा शोध घेण्याचे कार्य सुरु झाले.मात्र, उशीरापर्यंत तीच्यापर्यंत पोहोचता आले नाही.अखेर ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेवून कारच्या मालकासह पोलीसांना ओहोटीची वाट पाहत बसावे लागले.

३१ डिसेंबरच्या रात्री ते १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत कोठेही, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तिन्ही झोनमध्ये संबंधित पोलीस उपायुक्त बंदोबस्त प्रभारी राहणार आहेत.

- सदानंद दाते,पोलीस आयुक्त

दरम्यान,समुद्र किनारी रात्रीच्या अंधारात होणार्‍या आणि रिसॉर्टमध्ये रंगणार्‍या पार्ट्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी जाहीर केले आहे.३१ डिसेंबरच्या रात्री समुद्र किनार्‍यांसह मुख्य बाजारपेठा,चौक,रस्ते या ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह करणार्‍यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल,रिसॉर्ट किंवा गच्चीवर चालणार्‍या रेव्ह पार्ट्या, अंमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांवरही पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. त्यासाठी पोलीस अधिकारी,अंमलदार,आर.सी.पी.पथक,राज्य राखीव दल,होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.