Christmas at church

कोरोनाच्या(corona) पार्श्‍वभुमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी(social distancing) यंदाचा नाताळ मिसा ऑनलाईन (christmas  misa online) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई : कोरोनाच्या(corona) पार्श्‍वभुमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी(social distancing) यंदाचा नाताळ मिसा ऑनलाईन (christmas  misa online) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई तालुक्यात एकूण ३८ चर्च आहेत.२४ डिसेंबरच्या रात्री १० वाजता आपल्या जवळच्या चर्चमध्ये जावून ख्रिस्ती बांधव मिसा ऐकतात.मिसा संपल्यावर चर्चमध्येच ते एकमेकांना आलिंगन देवून हस्तांदोलन करून नाताळच्या शुभेच्छा देतात.त्यानंतर नियोजित ठिकाणी शेकडो लोक एकत्र येवून बॅन्डच्या तालावर,वाईन,मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेवून नाताळचा आनंद द्विगुणित करतात. आपल्या घरी बवनलेले करंज्या,वडे,लाडू,बिस्कीटे,इंदीयाल चिकन,मटण दुसर्‍या दिवसापासून एकमेकांच्या घरी पाठवण्याचा सिलसिला सुरु होतो.गाठी-भेटी होतात.जाहीर कार्यक्रम,पार्ट्यांमध्ये स्त्री-पुरुष सहभागी होतात.

सामाजिक अंतर राखणे,सॅनिटायजर,तापमापकचा वापर करणे आदी शासनाचे नियम पाळून चर्चमधून मिसा होईल.

- फादर फ्रान्सिस दिब्रिटो

ख्रिस्ती बांधव इतर जाती-धर्मातील आपल्या हितचिंतकांना,मित्रांना बोलवून त्यांच्यासोबत नाताळचा आनंद घेतात.एकमेकांची खुशाली कळवतात.यंदा मात्र,या सर्व कार्यक्रमांवर कोरोनाचे विरजण पडणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे असल्यामुळे जास्त गर्दीचे किंवा जाहीर कार्यक्रम,पार्ट्या कमी होतील.घरच्या घरीच कमी उपस्थितीत नाताळ साजरा केला जाईल.घरी येणार्‍या प्रत्येकाच्या हाती केकच्या आधी सॅनिटायजर पडणार आहे.नाताळचा मिसा नेहमीप्रमाणे चर्चमध्ये होईल का असा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीत राहिला असला तरी यंदाचा मिसा ऑनलाईन होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

यंदाचा मिसा ऑनलाईन असेल. घरी राहूनच त्याचा लाभ घेता येईल. घरच्या घरीच नाताळ साजरा करून,फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देण्याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल असेल.

- सुनील डिसिल्वा,नाळे

चर्चमध्ये मिसा होईल. त्याचा ऑनलाईन लाभ घेता येईल. प्रत्येकजण घरीच असल्यामुळे शुभेच्छाही ऑनलाईन,सोशल मीडिया किंवा फोनवरून दिल्या जातील.घरच्या घरीच गाणे लावून ख्रिसमस पार्टी केली जाईल.एकमेकांच्या घरी जाणे-येणे यंदा कमी होईल.ख्रिसमसचा आनंद नेहंमीप्रमाणे असेल, मात्र त्यात उत्साह कमी असेल.