gala

घातपाती सामुग्रीसह संपुर्ण ट्रक लपू शकेल असे घातपाती गाळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उभारले जात असून,ते त्वरीत जमीनदोस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा(protest) इशारा काँग्रेसने(congress) पालिका उपायुक्तांना दिला आहे.

वसई :घातपाती सामुग्रीसह संपुर्ण ट्रक लपू शकेल असे घातपाती गाळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर(Mumbai Ahmadabad highway) उभारले जात असून,ते त्वरीत जमीनदोस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा(protest) इशारा काँग्रेसने(congress) पालिका उपायुक्तांना दिला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार-उमर कंपाऊंड सर्वे क्र.५१,५२,२९१,४३१ या जागेवर उंच आणि भले मोठे गाळे उभारण्यात येत आहेत.पालिकेची कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात येत असलेल्या या गाळ्यांची कोठेही कोणतीही नोंद नसल्याने त्यात घातपाती साहित्य लपवण्याची भिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव कॅप्टन निलेश पेंढारी यांनी व्यक्त केली आहे.शहरात घातपाताच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत.हत्यारे आणि अंमली पदार्थांची तस्करीही वेळोवेळी उघडकिस येत आहे.अशावेळी संपुर्ण ट्रक लपु शकेल असे भलेमोठे अनधिकृत गाळे महामार्गालगत उभारले जात आहेत.

या गाळ्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून,घातपातालाही खतपाणी घालण्यात येत आहे,असा गंभीर आरोप पेंढारी यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. हे गाळे त्वरीत निष्कासित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पेंढारी यांनी पालिका उपायुक्त आशीष पाटील यांना दिला आहे.त्यावर पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पंढारी यांनी सांगितले.