कोरोनाने पुन्हा काढले डोके वर, गेल्या १० दिवसांत वसई विरारमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ

वसईत (corona patients in vasai virar)१९ मार्चपासून(शुक्रवारी) कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. शुक्रवारी ९१,शनिवारी १०९,रविवारी १०१,सोमवारी ६३,मंगळवारी १९८,बुधवारी २००, (१ मृत),गुरुवारी १७९,(२ मृत) पुन्हा दुसर्‍या शुक्रवारी म्हणजे २६ मार्चला-२०० (३ मृत),शनिवारी-२४२ आणि रविवारी-२९६ रुग्ण असा कोरोनाचा आलेख वाढत चालला आहे.

    वसई: वसई-विरारमध्ये(vasai virar corona patients) गेल्या १० दिवसांत १६७९ जणांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.हा कर्फ्यू तोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

    वसईत १९ मार्चपासून(शुक्रवारी) कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये कोरोनाचा कहर झाला आहे. शुक्रवारी ९१,शनिवारी १०९,रविवारी १०१,सोमवारी ६३,मंगळवारी १९८,बुधवारी २००, (१ मृत),गुरुवारी १७९,(२ मृत) पुन्हा दुसर्‍या शुक्रवारी म्हणजे २६ मार्चला-२०० (३ मृत),शनिवारी-२४२ आणि रविवारी-२९६ रुग्ण असा कोरोनाचा आलेख वाढत चालला आहे.रुग्णांसह मृतांचीही संख्या (१० दिवसांत ६ मृत) वाढत चालल्यामुळे शासन-प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले असले तरी नागरिकांमधली बेफिकीरी कमी झाली नाही.

    होळीच्या दिवशी सायंकाळपासून कर्फ्यू जाहीर करून आणि सात वाजण्यापुर्वी होळी पेटवण्याचे निर्देश देवूनही रात्री उशीरापर्यंत होळी जाळण्यात येत होती.साधेपणाने धुळवड साजरी करा,पाण्याचे फुगे,प्लास्टीकच्या पिशवीत पाणी भरून फेकणे अशा प्रकारास मज्जाव करण्यात आला तरी नेहमीप्रमाणे हे प्रकार सर्रास सुरु होते.

    नागरिकांची बेफिकीरी आणि वाढत्या रुग्णांमुळे अखेर कडक पावले उचलत रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यु लावण्यात आला असून,१५ एप्रिलपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे.रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता उद्याने,समुद्र किनारे,सायकल,मोटार,मोटार वाहनांनी विनाकारण फिरणे,दुकाने,हॉटेल,मॉल्स,चित्रपट गृहे,अशी सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश या अन्वये देण्यात आले आहेत.तसेच सामाजिक,राजकिय, धार्मीक,खाजगी समारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,क्रीडा स्पर्धा यासाठी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.ही बंदी मोडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.