Dead dolphins found on Rajodi beach; Chances of a shipwreck

  वसई : वसईच्या राजोडी किनारी सात फुट लांबीचा अवाढव्य डॉल्फीन मृतावस्थेत सापडला असून,त्याच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. वसईच्या अनेक किनारी डॉल्फीन आणि दुर्मीळ प्रजातीचे कासव येवू लागले आहेत. समुद्रात होणार्‍या आक्रमणामुळे हे जीव किनारी धाव घेत असून डॉल्फीन मृतावस्थेत सापडत आहेत. शनिवारी रात्री राजोडीच्या किनारी सात फुट लांब आणि सुमारे २५० किलो वजनाचा डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरिरावर अनेक जखमा आढळल्या. जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने डॉल्फीनला किनाऱ्यावर पुरण्यात आले.

  जहाजाला धडकल्याची शक्यता

  रविवारी आढळलेला मृत डॉल्फिनची लांबी ७ फूट इतकी आहे. तर यापूर्वी आढळलेल्या डॉल्फिनची लांबी चार ते सहा फूट होती. वसई तालुक्यात विविध समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या चार वर्षांत ५० हून अधिक मृत डॉल्फिन आढळले आहेत. हे डॉल्फिन मोठ्या जहाजांना धडकल्यामुळे मृत होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  प्रदूषणही मृत्यूस कारण

  स्थानिक रहिवासी आिण मासेमार बांधवांच्या मते, समुद्रात प्रदूषण वाढले आहे. तेल कंपन्यांकडून सर्वेक्षण, समुद्रात सुरूंग लावून स्फोट घडवणे आणि ओएनसीसीच्यास भूकंपीय संर्वेक्षणामुळे येथे मृत डॉल्फिन आढळत आहे. हे गंभीर असून यावर विचार करण्याची गरज मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.

  हे सुद्धा वाचा