Devotees returning home after visiting Ekvira Ai from Lonavla; Three killed, nine injured in road mishap

एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या इको कारला अपघात झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत(Devotees returning home after visiting Ekvira Ai from Lonavla; Three killed, nine injured in road mishap).

  मनोर : एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या इको कारला अपघात झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत(Devotees returning home after visiting Ekvira Ai from Lonavla; Three killed, nine injured in road mishap).

  जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

  सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवर भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात हेमंत तरे (वय ६०), सुषमा आरेकर (वय ३२), चालक राकेश तमोरे (वय ४२) यांचा मृत्यू झाला आहे. इको कारमधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत. मृतात एका महिलेचा समावेश आहे जखमींना महामार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  नियत्रंण सुटल्याने कंटेनरला धडकली

  महामार्गावर रविवारी सायंकाळी आवंढाणी गावच्या हद्दीत सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कार एमएच ४८ सीसी २२५२ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागच्या बाजूने धडल्याने अपघात झाला होता. अपघातात चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

  पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी होते. रविवारी सकाळी एकविरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळा येथे गेले होते. परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त इको कार मध्ये बारा प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.