आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी 

कासा  येथील भात खरेदी  बंद करून घोळ येथे  हे खरेदी केंद्र सूरु केले आहे. सद्या  भात १८६८  रु क्विंटल  असून सरकारने जाहिर केलेले  ७०० रु  बोनस  नंतर  शेतकऱयांच्या  खात्यात  जमा होणार आहेत, घोळ केंद्रात  आता  पर्यंत ५३० क्विंटल भात खरेदी  केले आहे.

कासा :  डहाणू (Dahanu) तालुक्यातील शेतकऱ्यांना  भात खरेदी  केंद्र  उशिरा सुरु झाल्याने  त्रास  झाला आहे. तालुक्यात घोळ, सायवन, गंजाड, धुंदल वाडी  या चार केंद्रात  भात खरेदी सुरु आहे, पण बारदान उपलब्ध  नसल्याने खरेदी उशिरा सुरु झाली आहे, शेतकरी आपले भात घरून भरून आणून भातखरेदी  केंद्रातील  बारदनात  पलटी मारून देतात. कासा  येथील भात खरेदी  बंद करून घोळ येथे  हे खरेदी केंद्र सूरु केले आहे. सद्या  भात १८६८  रु क्विंटल  असून सरकारने जाहिर केलेले  ७०० रु  बोनस  नंतर  शेतकऱयांच्या  खात्यात  जमा होणार आहेत, घोळ केंद्रात  आता  पर्यंत ५३० क्विंटल भात खरेदी  केले आहे.
खरं तर हे भातखरेदी  केंद्र नोव्हेंबर  महिन्यातच  सुरु केले  होते. पण बारदान ची कमतरता  असल्याने  खरेदी  नीट झाली नाही.त्यात  कासा येथील मध्यवर्ती  भागातील अनेक वर्षा  पासूनचे  भात खरेदी केंद्र  लांब  घोळ येथे नेल्याने  अनेक  शेतकरी  नाराज झाले, त्यांची मागणी आहे की हे केंद्र  कासा येथेच  असावे या बाबतीत  महामंडळाचे  अधिकारी  भुरे यांनी सांगितले  की बारदान  ची टंचाई  असल्याने  खरेदी   उशिरा  सुरु झाली. कासा येथे भात जमा करण्यास  गोडाऊन नव्हती. येथे   ती  सुविधा  असल्याने येथे खरेदी  केंद्र  सुरु केले.

घोळ येथे जाण्यासाठी रस्ता बरोबर नाही, त्या मुळे अनेक शेतकरी घरी येऊन भात खरेदी करणऱ्या सावकाराला भात विकत आहेत, त्या मुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यात ही खरेदी केंद्र सुरु झाली यांची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही. कासा या मद्यवर्ती भागात हे केंद्र असावे

रघुनाथ गायकवाड - सरपंच कासा शेतकरी

या भागातील अनेक गरीब शेतकऱ्यांना सावकार ८०० ते ९०० रु भाव क्विंटल ला देऊन मोठी लूट करीत आहेत. शेतकऱ्याच्या घरी जाऊन रोख पैसे चे आमिष दाखवून भात खरेदि करीत आहेत. त्यात आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र उशिरा सुरु केलीत.

सत्येन्द्र मातेरा -एकलव्य आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्य -पालघर जिल्हा सचिव.