वसई विरार महानगरपालिका आणि राज्यमंत्री बच्चू कडू
वसई विरार महानगरपालिका आणि राज्यमंत्री बच्चू कडू

विरारमधील व्यापार्‍यांवर लादलेला जिझीया कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ट्रेड लायसन्सच्या नावाखाली वसई-विरार महापालिकेने वसईतील व्यापार्‍यांवर व्यवसाय कर लादला आहे. हा कर १५ दिवसांत न भरल्यास त्यांचे गाळे सील करण्याची धमकीही पालिकेने जाहीर नोटीसीद्वारे दिली आहे.

वसई (Vasai).  विरारमधील व्यापार्‍यांवर लादलेला जिझीया कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ट्रेड लायसन्सच्या नावाखाली वसई-विरार महापालिकेने वसईतील व्यापार्‍यांवर व्यवसाय कर लादला आहे. हा कर १५ दिवसांत न भरल्यास त्यांचे गाळे सील करण्याची धमकीही पालिकेने जाहीर नोटीसीद्वारे दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात आधीच गांजलेले व्यापारी पालिकेच्या या नोटीसीमुळे भयभीत झाले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे, जनता दल अशा सर्वच पक्षांनी हा कर रद्द करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.

त्यांच्या पाठोपाठ आता प्रहार जनशक्ती संघटनाही वसईतील व्यापार्‍यांच्या मागे उभी राहिली आहे.उपविधी मंजुर नसतानाही व्यापार कर लादणे चुकीचे असल्याचे प्रहारचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख हितेश जाधव यांनी संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा जिझीया कर रद्द करण्यात यावा.अशी मागणी बच्चू कडू यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कोट-राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असून, शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.