college fire

उधवा (Udhava)येथील आदिवासी प्रगती मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालय जळून खाक(fire) झाले आहे. आहे. उधवा येथील परिसरात  विद्युत प्रवाह अचानक वाढल्याने आदिवासी प्रगती मंडळ महाविद्यालयाच्या कार्यालयातील विजेच्या साहित्यांना अचानक आग लागली.

    तलासरी : उधवा (Udhava)येथील आदिवासी प्रगती मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालय जळून खाक(fire) झाले आहे. आहे. उधवा येथील परिसरात  विद्युत प्रवाह अचानक वाढल्याने आदिवासी प्रगती मंडळ महाविद्यालयाच्या कार्यालयातील विजेच्या साहित्यांना अचानक आग लागली. टीव्ही, कॉम्प्युटर, सिलिंग फेन, टेलिफोन, केक्युलेटर, प्रिंटर, थम मशीन, सिलिंग फेन,टेबल कपाट फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये सुमारे दोन ते अडीच लाखा रुपयांचे नुकसान झाले.

    वीज प्रवाह अचानक वाढल्याने शॉटसर्किट होऊन विजेच्या साहित्याला आग लागली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी परिसरात पाच ते सहा घरातील विजेच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले असून काही दुकानातील फ्रिज जळून खाक झाले आहे.

    महाविद्यालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवल्याने  मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आदिवासी प्रगती मंडळ महाविद्यालयाच्या कार्यलयत अचानक आग लागली. कार्यालयाला लागलेल्या आगीने अचानक रौद्ररूप धारण केले. एका कर्मचाऱ्यांला आग लागल्याचे लक्षात आल्यावर आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमले तोपर्यंत आगीच्या ज्वालांचा भडका उडाल्याने कार्यलयातील विजेवर चालणारे साहित्य जळून खाक झाले होते.

    यावेळी कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयातील पूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्मचारी आणि ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवल्याने अनर्थ टळला असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी बादली आणि पंपाच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कार्यलय जळून खाक झाले.